कोकण दर्पण ! कोकण LIVE
पनवेल : कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता जनसेवा करणाऱ्या व्यक्तींचा बाँबे ओरिया वुमेन्स असोसिएशनच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
यामध्ये डॉक्टर्स, नर्स, पोलीस कर्मचारी, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, समाजसेवक, पत्रकार आदींचा समावेश होता. यावेळी रॉबिनहूड आर्मी, सेवा फाउंडेशन्स, रिलान्स मार्ट, मोथरहूड हॉस्पिटल, आपलं महानगराचे ब्युरोचीफ संजय महाडिक, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, युवा नेता अमर उपाध्यय, नगरसेविका हर्षदा उपाध्यय , कमल ज्योती फाउंडेशनच्या अध्यक्षा गीता चौधरी, साऊथ इंडियन सेलच्या शामला शेट्टीगर, चंद्रकांत राऊत, चिन्मयी राऊत, डॉ पंकज तिदार, पनवेल मनपाच्या डॉ. अश्विनी देगावकर, पोलीस निरीक्षक मीरा बनसोडे, मीनल बिडवे , कमांडर कलावत, मंजुनाथ कॅटरेस, संतोष सिंग, डॉ प्रशांत मोहंती, डॉ सुभाषीस पांडा, प्रथमकुमार सक्सेना आदींचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
यावेळी बाँबे ओरिया वुमेन्स असोसिएशनच्या अध्यक्षा कणणिका त्रिपाठी, जनरल सेक्रेटरी मधुमिता जेना उपाध्यक्षा मीरा मिश्रा व बाँबे ओरिया वुमेन्स असोसिएशनचे इतर सदस्य उपस्थित होते.





