Press "Enter" to skip to content

२५ वी राष्ट्रीय रोड सायकलिंग स्पर्धा !महाराष्ट्राच्या स्नेहल माळीला कास्य पदक !

कोकण दर्पण ! कोकण LIVE
पनवेल : पनवेल महानगर पालिका पुरस्कृत २५ वी राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा नुकतीच पनवेल नवी मुंबई येथे संपन्न झाली. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियन व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांचे देखरेखीत सोनी स्पिंग क्लब खारघर व राजेंद्र सोनी इंटरनॅशनल सायकलिस्ट भारतीय रेल्वे कोच व निवड समिती सदस्य यांनी सदर स्पर्धेचे आयोजन केले होते.

               या स्पर्धेत  सुंमारे १०००  विजेते सायकलपटु आपले सर्व कसब दाखविली. या स्पर्धेत   महाराष्ट्र कडुन स्नेहल शत्रुघ्न माळी वय १४ वर्ष हिने कास्य पदक पटकावले आहे. सायकलिंग स्पर्धेत महाराष्ट्राला पदक मिळवून देणारी पहिली कन्या होण्याचा मान स्नेहल शत्रुघ्न माळी हिने प्राप्त केला आहे. यावर्षात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताकडुन सहभागी होणार आहे.  या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धाकरीता संपुर्ण भारतातून प्रत्येक  राज्यातून तेथील विजेते ,रेल्वे ,पोलीस, भारतीय सेना दल, बीएसएफ व आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय विजेते, पुणे बालेवाडी , स्पोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ इंडियाचे खेळाडू सहभागी झाले होते. 
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »