Press "Enter" to skip to content

सिवुड्स – नेरुळ परिसरातील बेकायदा, बेवारस वाहनांवर कारवाई करावी ! रणजित नाईक यांची मागणी !

कोकण दर्पण ! कोकण LIVE
नवी मुंबई : सिवुड्स – नेरुळ परिसरात अनेक महिन्यांपासून बेकायदा व बेवारसपणे उभ्या असलेल्या बसेस व अन्य वाहनांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, परिसरातील सदर वाहने हटवावीत, अशी मागणी नवी भाजप युवा सरचिटणीस रणजित नाईक यांनी केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन रणजित नाईक यांनी नेरुळ पोलीस ठाणे व तुर्भे- वाशी वाहतूक पोलिसांना दिले आहे.

सिवुड्स- नेरुळ परिसरातील एअर इंडिया कॉलनी समोरील रस्त्यावर अनेक महिन्यांपासून बेवारस बसेस रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभ्या करण्यात आल्या आहेत.रात्रीच्या वेळात मद्यपी व गर्दुल्ले सदर बसेस मध्ये बसून मद्य प्रश्न करतात. बंद गाडीत अनेकदा अश्लील चाले देखील सुरु असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे भुरट्या चारांचे प्रमाण वाढले वाढले आहे. सदर परिस्थिती येथील कायदा सुव्यवस्था व सुरक्षा धोक्यात आणत आहे.भविष्यत येथे मोठा अनुचित प्रकार घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासन व वाहतूक विभागाने सदर प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी रणजित नाईक यांनी केली आहे.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »