कोकण दर्पण ! कोकण LIVE
नवी मुंबई : कम्युनिस्ट नेते तथा कामगार नेते केशवराव मुनशी याच्या पत्नी सुधा मुनशी यांचे आज अमरावती येथे दुःख निधन झाले. कामगारांची माय हरपली अशी भावना अमरावतीकरांनी व्यक्त केली आहे.
सुधा मुनशी या जगदळे ले आऊट, मुळचे अंबापेठ निवासी कै. केशवराव मुनशी यांच्या पत्नी होय. सुधा मुनशी यांचे आज दिनांक १० मार्च २०२१ रोजी दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. अत्यंत प्रेमळ,मनमिळाऊ, कुटुंबातील सगळ्यांचा प्रेमाने सांभाळ करणारी माऊली आज काळाच्या पडद्याआड गेली. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली व नातवंड असा परिवार आहे .





