कोकण दर्पण ! कोकण LIVE
पनवेल : पनवेलकरांना आधी संपूर्ण सुविधा द्या, त्यानंतर मालमत्ता कर आकारा, अशी मागणी मागणी काँग्रेसचे नेते सुनील सावर्डेकर यांनी पनवेल महानगर पालिकेकडे केली आहे.
याबाबतचे लेखी निवेदन काँग्रेसच्या वतीने पालिका उपायुक्त संजय शिंदे यांना दिले आहेत. सिडकोने शहरात सर्व सुविधा पुरविल्या आहेत. सिडकोला नागरिक सेवा कर भरते, जो पर्यंत पालिका सर्व विभागाचा ताबा घेत नाही, संपूर्ण सुविधा पुरवीत नाही, तोपर्यंत कर आकारू नये, अशी काँग्रेसची मागणी आहे. पालिकेने पाठवलेल्या नोटिसांना हरकती व सूचना करण्यासाठी आणखी 30 दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केलीय.





