- काँग्रेसची मागणी !
कोकण दर्पण ! कोकण LIVE
पनवेल : चर्मकार व वाल्मिकी समाजबाबात जातीवाचक शब्द वापरून भारतीय सांविधान व आरक्षण मूल्यांचा अवमान करण्याऱ्या
झी 5 निर्मित माफिया वेब सिरीज मालिकेतील संबंधितांवर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अनुसूचित जाती कमिटीचे प्रदेश समन्वयक तथा कोकण प्रभारी सुनील सावर्डेकर यांनी खारघर पोलिसांकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
झी 5 द्वारा निर्मित केलेल्या माफिया वेब सिरीजमध्ये अनुसूचित जातीच्या समाजाबाबत गलिच्छ शब्दात जातीवाचक शब्द वापरण्यात आले आहेत. त्यामुळे सदर सिरीजचे निर्माते, दिग्दर्शक व संबंधितांवर अट्रोसिटी गुन्ह्या अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी सुनील सावर्डेकर यांनी केली आहे.





