- नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा : गीता चौधरी !
कोकण दर्पण ! कोकण LIVE
पनवेल : कमलज्योती फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा भाजप रायगड जिल्हा सचिव गीता चौधरी यांच्या पुढाकाराने खारघर येथे मतदार स्मार्टकार्ड, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना व आयुषमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना नोंदणी शिरीराचे आयोजन करण्यात आले आहे.
खारघर सेक्टर ११ येथील केंद्रीय विहार मधील शिवशम्भू सोसायटीत १० ते १२ मार्च दरम्यान सदर तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विभागातील ज्या नागरिकांचे नाव मतदार यादीत आहे, त्यांना स्मार्ट व्होटर कार्ड देण्यात येणार आहे. शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजने अंतर्गत कुटुंबाबाला दीड लाख रुपये अर्थसहाय्य मिळते, तर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत कुटूंबाला ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळते. यावेळी शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची नागरिकांना माहिती देऊन त्याचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्यात येणार असून नोंदणी केलेल्या नागरिकांना पुढील दहा दिवसात स्मार्ट हेल्थ कार्ड देण्यात येणार आहे. नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक गीता चौधरी यांनी केले आहे.





