Press "Enter" to skip to content

खारघर येथे मतदार स्मार्टकार्ड नोंदणी शिबिर संपन्न ! नगरसेवक नरेश ठाकूर यांचा पुढाकार !

-महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना ,
-आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य
योजना नोंदणी शिरीराचे आयोजन !
-शेकडो नागरिकांनी घेतला लाभ !

कोकण दर्पण ! कोकण LIVE
पनवेल : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिकेतील खारघचे नगरसेवक ऍड. नरेश ठाकूर यांनी खारघर येथे मतदार स्मार्टकार्ड, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना व आयुषमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना नोंदणी शिरीराचे आयोजन केले होते. खारघर सेक्टर १० येथे ८ व ९ मार्च दरम्यान संपन्न झालेल्या सदर दोन दिवशीय शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.
खारघर प्रभाग क्रमांक ६ मधील सेक्टर १० व कोपरा गावातील नागरिकांसाठी विशेषत्वाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विभागातील ज्या नागरिकांचे नाव मतदार यादीत आहे, त्यांना नगरसेवक नरेश ठाकूर यांच्याकडून स्मार्ट व्होटर कार्ड मोफत देण्यात येणार आहे.
यावेळी शासकीय योजनांची माहिती व नोंदणी शिबीर देखील संपन्न झाले. शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजने अंतर्गत कुटुंबाबाला दीड लाख रुपये अर्थसहाय्य मिळते, तर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत कुटूंबाला ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळते. यावेळी शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची नागरिकांना माहिती देऊन त्याचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्यात आली. नोंदणी केलेल्या नागरिकांना नगरसेवक नरेश ठाकूर यांच्यावतीने स्मार्ट हेल्थ कार्ड मोफतपणे देण्यात येणार आहे.
सदर शिबिराला पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, युवानेते समीर कदम, भाजप नेते वासुदेव पाटील , खारघर उपाध्यक्ष दिलीप जाधव, नगरसेविका अनिता पाटील, संजना कदम , नगरसेवक शत्रुघ काकडे , भाजप खारघर महिला मोर्चा चिटणीस मीरा घुगे आदी उपस्थित होते.
सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी भाजप खारघर उपाध्यक्ष सुरेश ठाकूर , राम सोनावणे, रमेश रामन, दिलीप पांचाळ , मोहनसिंग भीष्ट, नेहा यादव, मीता हंसा, जोत्स्ना पामकर , मनीषा कोटकर आदींनी मेहनत घेतली.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »