Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादी खारघर महिला कार्यकारिणी जाहीर !

कोकण दर्पण ! कोकण LIVE
पक्ष वाढविण्यासाठी महिलांचे संघटन मजबूत करणार : राजश्री कदम यांचा विश्वास !
खारघर सेक्टर १५ अध्यक्षपदी
नीता निपाने यांची निवड !

पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खारघर शहर महिला अध्यक्षा राजश्री कदम यांनी शुक्रवारी खारघर शहराची नवीन महिला कार्यकारिणी जाहीर केली.

राष्ट्रवादी काॅग्रेस खारघर महिला कार्यकारिणीत उपाध्यक्षा सुनंदा कुंभार, उपाध्यक्षा संगीता सुर्वे, सचिव चेतना तोटकेकर, सहसचिव रेखा भागवत, सेक्टर १२ अध्यक्षा राजश्री कदम, सेक्टर ११ अध्यक्षा माधवी ओंबळे, सेक्टर २० अध्यक्षा सुनिता डेरे, सेक्टर १५ अध्यक्षा निता निपाने, सेक्टर १० अध्यक्षा हेमलता घाडगे, सेक्टर ४ अध्यक्षा सोनाली पालव, सेक्टर १२ उपाध्यक्षा संगीता पवार, सेक्टर १५ उपाध्यक्षा छाया वैराग्य, सेक्टर १० उपाध्यक्षा वंदना पोतदार, तसेच सभासद म्हणून सारीका शिरसागर, विजया मोहीते, राजश्री नारकर आदींचा समावेश आहे. राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्षा रुपालीताई चाखणकर यांच्या आदेशानुसार, पनवेल जिल्हा महिला निरीक्षक भावनाताई घाणेकर व पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार महिला खारघर शहर अध्यक्षा राजश्रीताई कदम यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हा सचिव नेहा पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादीचे नेते सुरेश रांजवन, उपाध्यक्ष योगेश निपाने, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष विजय मयेकर, जिल्हा ओबीसी सेल उपाध्यक्ष जेजबिंदर सिंग, खारघर युवती अध्यक्षा स्नेहल शेवाळे
तसेच अनेक कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »