कोकण दर्पण ! कोकण LIVE
पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर नोड मध्ये आलेल्या प्रॉपर्टी टॅक्स संदर्भात नोटिसीबाबतचे समज, गैरसमज दूर करण्यासाठी ५ मार्च रोजी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या दालनात महाविकास आघाडीतर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, नगरसेवक शंकर म्हात्रे, डॉ सुरेखा मोहोकर यांच्यासह पनवेल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ चौधरी, शिवसेना खारघर शहर अध्यक्ष शंकर ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस खारघर शहर अध्यक्ष सुरेश रांजवन, काँग्रेसचे कलावत साहेब, शेकापचे गुरुनाथ गायकर, राष्ट्रवादी खारघर उपाध्यक्ष योगेश निपाने, काँग्रेसचे लतीप नातखंडे, राकेश चव्हाण, अजित अडसूळ आदी उपस्थित होते.
खारघरचे डेव्हलपमेंट झालेली नाही. 40 टक्के डेव्हलपमेंट अजूनही बाकी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बाकी राहिलेले डेव्हलपमेन्ट सिडकोने पूर्ण करावी आणि त्यानंतर नोड ट्रान्सफर करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. खारघर मध्ये सिडकोमार्फत सुखसोई, सेवा डेव्हलपमेंट करायच्या बाकी आहेत. ते केल्यानंतर नोड ट्रान्सफर करा आणि त्यानंतर टॅक्स वसूल करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. नोटिस मिळाल्यापासून 21 दिवसांच्या आतमध्ये नागरिकांनी हरकती घ्याव्यात. टॅक्स कमी जास्त आलेला असेल तर हरकती घ्याव्यात असे आवाहन पालिकेने केले आहे. सिडकोकडून आणि महापालिकेकडून टॅक्स लावला जातोय. दोन्हीकडून टॅक्स लावण्यात आल्याने नागरिक संभ्रमात आहेत.
यापूर्वीच खारघरच्या नागरिकांनी डेव्हलपमेंट चार्ज भरलेला आहे. मात्र पूर्ण डेव्हलप न झाल्याने टॅक्स लावन्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांकडून त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यात आले आहे.
५ वर्ष करवाढ करणार नाही हे सत्ताधाऱ्यांनी दिलेले वचन कुठे गेले. नागरिकांना सुविधा दिल्यानंतर कर घ्या. सिडको हद्दीतील नागरिकांनी सर्व्हिस चार्जच्या रूपाने कर भरलेला आहे. सिडकोकडून हस्तांतरित करा आणि तुम्ही सुविधा द्या आणि नंतर कर घ्या. निवडून आलात त्यावेळेस नागरिकांवर ५ वर्षे कोणतीही करवाढ करणार नसल्याचे सत्ताधाऱ्यांनी सांगितले होते. या वाद्याला सत्ताधारी पक्के नाहीत. – प्रितम म्हात्रे , विरोधी पक्षनेते, पनवेल महानगर पालिका

प्रॉपर्टी टॅक्स संदर्भात विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या दालनात बैठक संपन्न !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- पनवेलमध्ये ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ समर्थनार्थ भव्य पदयात्रा उत्साहात
- माणगाव घटनेप्रकरणी दोन्ही गटांवर क्रॉस गुन्हे दाखल ! शरद सावंत यांच्या प्रकरणात कायद्याच्या चौकटीत राहून तपास सुरु ! वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांची माहिती !
- पत्रकार परिषद ! माणगाव 10 लाख खंडणी प्रकरण ! पोलीस अधिकाऱ्यांनी तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप ! माणगाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांची चौकशी करा ! मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांकडे शरद सावंत यांची मागणी !
- सोनखार-पामबीचमध्ये ‘संयुक्त कुटुंब’ संकल्पगुढी; ढोलताशा-लेझीम, महाराष्ट्रीयन पोशाखातील रॅम्प वॉकने नववर्षाचा उत्सव रंगला




