Press "Enter" to skip to content

खारघरमध्ये सोल बिट डान्स अँड फिटनेसचे उदघाटन ! झुंबा, योगा, डान्ससह अनेक ऍक्टिव्हिटीचे सेंटर !

कोकण दर्पण ! कोकण LIVE ! संजना महाडिक

खारघरवासियांच्या आरोग्यासाठी उत्तम पर्वणी :
-निलेश बाविस्कर यांचे प्रतिपादन !

पनवेल : खारघर येथे सोल बिट डान्स अँड फिटनेस सेंटरचे उदघाटन पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. खारघर सेक्टर १८, मोनार्च फॉर्च्युन इमारतीत शॉप नंबर पाच मध्ये सुरु झालेल्या सदर फिटनेस सेंटरमध्ये झुंबा, योगा, डान्ससह अनेक ऍक्टिव्हिटीचे प्रशिक्षण वर्ग चालणार आहेत. मीना कुलकर्णी, एलिना रे आणि दीपिका साहू या सोल बिट डान्स अँड फिटनेस सेंटरच्या संचालिका आहेत.

आज प्रत्येकजण आपले जीवन धावपळीत जगतोय. पुरुष असो किंव्हा महिला असो, त्यांची जीवनशैली अतिशय गतिमान झाली आहे. आजचे विधार्थी अभ्यासामध्ये इतके गुंतले आहेत,कि त्यांना खेळायला वेळ नाही. तरुणपिढी आपल्या करियमागे इतके व्यस्त आहेत कि त्यांना आपल्या शरीरासाठी व्यायाम करायला वेळ नाही. याची दाखल, खारघरवासियांच्या आरोग्याची काळजी घेत मीना कुलकर्णी, एलिना रे आणि दीपिका साहू यांनी खारघर सेक्टर १८ मध्ये सोल बिट डान्स अँड फिटनेस सेंटर सुरु केले आहे. नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या हस्ते सदर सेंटरचे उदघाटन करण्यात आले, यावेळी भाजपच्या कांचन बिर्ला तसेच अनेक महिला उपस्थित होत्या.

सदर सेंटरमध्ये झुंबा, योगा, डान्ससह संगीत तसेच महिला व विध्यार्थ्यांसाठी विविध ऍक्टिव्हिटी सुरु केल्या जाणार आहेत. विध्यार्थ्यांसाठी समर कॅम्पचे आयोजन केले जाणार आहे. आठवड्यातून पाच दिवस झुंबा व दोन दिवस डान्स प्रशिक्षण दिले जाणार आहे. कपलसाठी शनिवार व रविवारी दोन दिवस स्पेशल बॅचेस चालविल्या जाणार आहेत. त्यामध्ये त्यांना साल्सा व जाईव्ह नृत्य शिकविले जाणार आहे. मीनाक्षी पटेल या योग प्रशिक्षण देणार असून झुंबा व डान्स नम्रता गुप्ता व रक्षा भोसले शिकविणार आहेत.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »