Press "Enter" to skip to content

महाआघाडीची आक्रमक भूमिका ! विकास नाही तर टॅक्स नाही !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महानगर पालिका जो पर्यंत विकास करीत नाही, तो पर्यंत मालमत्ता कर भरणार नाही, अशी आक्रमक भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे.

पनवेल महानगरपालिकेने पाठवलेल्या मालमत्ता काराच्या नोटीसीनंतर महाविकास आघाडीच्या वतीने खारघर येथे मंगळवारी विशेष बैठक घेण्यात आली. त्यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने खारघर मधील जनतेस मालमत्ता कर न भरण्याचे आवाहन केले.

महाविकासआघाडी खारघरचे नेते जिल्हा प्रमुख शिरीष घरत, राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य बी.ए.पाटील, कांग्रेसचे नेते विश्वनाथ चौधरी, शेकापचे नेते राम करावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर मध्ये प्रोपर्टी टॅक्स विरोधात बैठक झाली. यावेळी खारघर मधील जनतेस विकास नाही तर टॅक्स नाही याबाबत आवाहन केले.
पनवेल महानगरपालिकेच्या वतीने पालिका क्षेत्रात अन्यायकारक प्रोपर्टी टॅक्स लादण्याचा प्रयत्न चालू आहे. ते आम्ही कदापि होऊ देणार नाही. आम्ही खारघरच्या जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत त्या बद्दल जनतेने कोणतीही काळजी करू नये. असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले.
या प्रसंगी पनवेल शहर जिल्हा सरचिटणीस रामदास नारकर, महाविकासआघाडीचे अध्यक्ष शंकर ठाकुर, उपाध्यक्ष बळीराम नेटके, खजिनदार तथा नगरसेवक गुरुनाथ गायकर व सदस्य रामचंद्र देवरे, योगेश निपाने,मोहिते मॅडम,नरेश पाटील,मोरबेकर,अजित घरत इत्यादि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी खारघर मध्ये आमदार बाळाराम पाटील, बबन पाटील, सतीश पाटिल, शिवदास कांबळे,आर,सी,घरत,सुदाम पाटील यांच्या उपस्थित जनतेसी खुली चर्च्या करण्यात आली होती. त्यावेळी खारघर मधील जनतेने प्रोपटी टॅक्स बद्दल खुप नाराजी व्यक्त केली होती.

कोकण दर्पण ! कोकण LIVE

महाआघाडीची आक्रमक भूमिका !
विकास नाही तर टॅक्स नाही !

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »