पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महानगरपालिकेतील खारघर येथील नगरसेविका संजना समीर कदम यांच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांबाबत कार्ड वाटप करण्यात आले.
याबाबत २२ ते २४ जानेवारी दरम्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान डिजिटल लिटरसी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक कार्ड, पॅनकार्ड, या योजना राबविण्यात आल्या होत्या. सदर शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या योजनांमध्ये तयार करण्यात आलेले प्रमाणपत्र व कार्ड याचे वाटप पनवेल आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका संजना समीर कदम, खारघर तळोजा मंडळाचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, भारतीय जनता युवा मोर्चा सरचिटणीस समीर कदम, तालुका उपाध्यक्ष संतोष शर्मा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस विजय मोरे तसेच युवा मोर्चाचे खारघर तळोजा मंडळाचे सदस्य सुशांत पाटोळे, राजू अचलकर व प्रभाग क्रमांक ०६ मधील भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आपल्या प्रभागातील व खारघर परिसरातील विविध नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला त्यामुळे या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्र व कार्ड घेण्यासाठी लोकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान नगरसेविका संजना समीर कदम यांनी आपण आपल्या कार्यालयामध्ये विविध सरकारी योजनांचे आयोजन आपण यापूर्वीही केले आहे. तसेच यानंतरदेखील जा योजना लोकांसाठी आवश्यक आहेत त्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते आम्ही आमचा जनसंपर्क कार्यालयातून करू व लोकांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ कसा देता येईल यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशिल राहू अशी ग्वाही दिली.
सर्व नगरसेवक आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे कार्य करीत आहेत, त्याला आपण कुठेतरी गती देत आहोत अशा प्रकारची भावना जनसामान्यांमध्ये पोहोचेल व लोकचा पाठीशी आपण सातत्याने उभे राहून लोकांची सेवा करावी व आपण घेतलेले हे लोकसेवेचे व्रत यापुढेदेखील अखंड चालू ठेवावे अशी अपेक्षा संजना समीर कदम व समीर कदम यांनी करावे अशा शुभेच्छा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिल्या.
कोकण दर्पण ! कोकण LIVE





