Press "Enter" to skip to content

खारघर येथे रक्तदान शिबीर संपन्न ! सुरेश रांजवण यांचे आयोजन !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : डीव्हीएम फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खारघर शहर अध्यक्ष सुरेश रांजवण व नारायण गायकवाड प्रदीप पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर येथे आयोजित केलेल्या रक्तदान महाशिबिरात ७२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप म्हात्रे, पनवेल जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष विजय मयेकर, रोडपाली शहर अध्यक्ष शरद गायकवाड ,पनवेल विधानसभा युवा अध्यक्ष सुनील ढोंगरे, पनवेल ग्रामीण अध्यक्ष दर्शन ठाकूर, ग्रामीण युवा सचिव संकेत वाणी, पनवेल जिल्हा सरचिटणीस रामदास नारकर, पनवेल जिल्हा सचिव प्रसाद ढगे-पाटील, खारघर शहर उपाध्यक्ष योगेश निपाने, पनवेल विधानसभा ग्रामीण सचिव प्रभाकर फडके, पनवेल जिल्हा युवक कर्यायध्य मंगेश नेरुळकर, पनवेल जिल्हा महिला सचिव नेहा पाटील, खारघर महिला शहर अध्यक्ष राजश्री पाटील, मोहिते मॅडम व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील रक्तदान केले.
रक्तदान शिबिराला कृष्णा मरडेकर, भाऊसाहेब लबडे, रोहित जाधव, संतोष पाटील, सुनील रांजवण, अमोल पाटील, अनिल हिनुकले, उत्कर्ष रांजवण, सूरज केसरे आदींचे सहकार्य लाभल्याचे सुरेश रांजवण यांनी सांगितले.

कोकण दर्पण ! कोकण LIVE

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »