कोकण दर्पण ! कोकण LIVE ! संजना महाडिक
- योगा आणि अनेक ऍक्टिव्हिटीचे प्रशिक्षण केंद्र !
- खारघरवासियांच्या आरोग्यासाठी उत्तम पर्वणी !
पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : आपलं शरीर आणि मन जेव्हा एकरूप होतात, तेव्हा आपलं आरोग्य सदृढ आणि निरोगी राहते. म्हणूनच आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. समाजाच्या आरोग्याची जबाबदारी घेणे हे एक सामाजिक दायित्व आहे. हे दायित्व , हि जबाबदारी ‘एसपीआर हेल्थ वल्डने उचलली आहे. खारघर येथे योगा आणि विविध ऍक्टिव्हिटीचे सेंटर सुरु करून खारघरवासियांसाठी मोठी पर्वणी उभी केली आहे. हे वैविध्यपूर्ण कलाकुसूरींचे प्रशिक्षण केंद्र आहे. आर्ट, क्राफ्ट व पेंटिंग क्षेत्रात पारंगत असलेल्या योग प्रशिक्षिका सुरेखा शिंदे यांचा हा विशेष उपक्रम आहे.
खारघर सेक्टर १९ येथील राज टॉवर इमारतीत सुरु झालेल्या ‘एसपीआर हेल्थ वल्ड योगा अँड ऍक्टिव्हिटी सेंटरचे रविवारी अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले.व्यंगचित्रकार लेखक, संपादक , मोटिव्हेशनल ट्रेनर, विवेक मेहेत्रे, योगाचार्य डॉ. सुधीर मोंडकर, डॉ. लक्ष्मण महाडिक, भाजप वैद्यकीय सेलचे अध्यक्ष किरण पाटील, मनसे खारघर महिला अध्यक्षा चंचला, शेफ गौरी गुजर,‘एसपीआर हेल्थ वल्डच्या व्यवस्थापकीय संचालिका सुरेखा शिंदे तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्वप्न पूर्ण होत नाहीत, तर ध्येय पूर्ण होतात, आज सुरेखा शिंदे यांनी खारघर येथे ‘एसपीआर हेल्थ वल्ड योगा अँड ऍक्टिव्हिटी सेंटर सुरु करून आपले ध्येय पूर्ण केले आहे. योग, कला, नृत्य, संगीत अशा अनके कलांना एकत्र आणून खारघरवासीयांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली, अशा शब्दात व्यंगचित्रकार लेखक, संपादक तथा मोटिव्हेशनल ट्रेनर विवेक मेहेत्रे यांनी शुभेच्छा दिल्या. आरोग्य म्हणजे केवळ शारीरिक आरोग्य नव्हे तर मन आणि शरीर यांचा विकास होय,मन आणि शरीर एकत्र येणे म्हणजे योग होय, हे एकत्र येण्यासाठी संगीत, योग ,कलेच्या माध्यमातून अभिव्यक्त होण्याची संधी सुरेखा शिंदे यांनी ‘एसपीआर हेल्थच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्याची प्रतिक्रिया योगाचार्य डॉ. सुधीर मोंडकर यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी डॉ. लक्ष्मण महाडिक, भाजप वैद्यकीय सेलचे अध्यक्ष किरण पाटील यांनी ‘एसपीआर हेल्थला शुभेच्छा दिल्या. आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. सुदृढ, निरोगी शरीर नसेल तर जगण्याचा आनंद मिळणार कसा ? म्हणून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. ‘एसपीआर हेल्थ वल्डच्या माध्यमातून योगा बरोबर बॉलिवूड डान्स, भरतनाट्यम, संगीतवाद्य, गायन आदींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. योगा प्रशिक्षणाचे विशेष भरविले जाणार आहेत. १ मार्च पासून नियमित वर्ग सुरू होणार असल्याची माहिती एसपीआर हेल्थ वल्डच्या व्यवस्थापकीय संचालिका सुरेखा शिंदे यांनी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री अलका शिंदे व डॉ राजेंद्र शिंदे यांनी केले. एसपीआर हेल्थ वल्डचे प्रथमेश शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कोकण दर्पण.





