Press "Enter" to skip to content

खारघरमध्ये सुरू होतंय ‘एसपीआर हेल्थ वल्ड’ योगा अँड ऍक्टिव्हिटी सेंटर !

कोकण दर्पण ! कोकण LIVE

आजच्या धावपळीच्या जीवनात माणसाला स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला वेळ नाही. मग, आपण जगतो कशासाठी, आपण कमावतो कशासाठी हा प्रश्न निर्माण तयार होतो. जगायला सुदृढ, निरोगी शरीर नसेल तर जगण्याचा तो आनंद काय ? म्हणून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम करायला हवा, योगा करायला हवा, किमान थोडं चालायला तरी हवे.

आता, खारघरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खारघरमध्ये एसपीआर हेल्थ वल्डसुरू होत आहे. योगा प्रशिक्षणासोबत इथे इतर अनेक कलागुणांना वाव देणारे ऍक्टिव्हिटी सेंटर असेल.
खारघर मधील एक महिला उद्योजिका असलेल्या सुरेखा शिंदे यांनी हे धाडसी पाऊल उचलत खारघर सेक्टर १९ येथील राज टॉवर इमारतीत एसपीआर हेल्थ वल्ड हे योगा अँड ऍक्टिव्हिटी सेंटर रविवार पडून सुरू होत आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या सेंटरचा शुभारंभ होणार आहे. योगा बरोबर येथे बॉलिवूड डान्स, भरतनाट्यम, संगीतवाद्य, गायन आदींचे प्रशिक्षण दिले जाणार असून योगा प्रशिक्षणाचे विशेष भरविले जाणार आहेत, १ मार्च पासून नियमित वर्ग सुरू होतील,अशी माहिती एसपीआर हेल्थ वल्डच्या व्यवस्थापकीय संचालिका सुरेखा शिंदे यांनी दिली.

संजना महाडिक.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »