Press "Enter" to skip to content

सीबीडी गड भाजपच जिंकणार : आमदार गणेश नाईक !

कोकण दर्पण ! कोकण LIVE

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सीबीडी- बेलापूर गड भाजपच जिंकणार असा विश्वास आमदार गणेश नाईक यांनी सीबीडी येथे व्यक्त केला. सीबीडी विभागातून स्वाती गुरखे, सुरेखा नरबागे, चैताली ठाकूर यांच्या उमेदवारी निश्चित असल्याचे घोषित करून विजयासाठी जोरदार कामाला लागा, अशा सूचना देखील दिल्या.

महाविकास आघाडीला रोखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. आमदार गणेश नाईक आणि आमदार मंदाताई म्हात्रे यांनी प्रत्येक प्रभागाकडे बारकाईने लक्ष देण्याचे ठरविले आहे. सध्या प्रत्येक प्रभागात कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. सीबीडी प्रभाग १०२ मध्ये माजी नगरसेवक अशोक गुरखे व माजी नगरसेविका स्वाती गुरखे यांचा माध्यमातून महिलांसाठी हळदी कुंकू व प्रभागातील नागरी कामांचे लोकार्पण तसेच स्वछता जनजागृती अभियान ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणेश नाईक यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्शवभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. प्रभाग क्रमांक १०२ मधून स्वाती गुरखे, प्रभाग क्रमांक १०३ मधून सुरेखा नरबागे तर प्रभाग क्रमांक १०४ मधून चैताली ठाकूर यांची उमेदवारी निश्चित असल्याचे गणेश नाईक पुनःश्च घोषित केले. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »