Press "Enter" to skip to content

पनवेल महापालिकेत मनसेचे नगरसेवक निवडून जातील : नितीन सरदेसाई !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : २०२२ मध्ये होणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक निवडून जातील, असा विश्वास मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी खारघर येथे व्यक्त केला. खारघर येथे मनसे शाखेच्या उदघाटनप्रसंगी श्री सरदेसाई आले होते. आगामी काळात होणाऱ्या पनवेल महापालिका निवडणुकीबाबत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आगामी काळातील पनवेल निवडणुकीचे लक्ष ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागा, असे निर्देश देखील त्यांनी यावेळी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले. मनसेच्या शाखा असाव्यात अशी लोकांची मागणी होती , त्यानुसार खारघरमध्ये शाखेचे उदघाटन करण्यात आले, असून भविष्यात आणखी शाखा वाढतील. मनसे शाखांच्या माध्यमातून लोकांची कामे होतील, असा विश्वास सरदेसाई यांनी व्यक्त केला.
यावेळी मनसे व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार, रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष गजानन काळे, रायगड जिल्हा विध्यार्थी सेलचे अध्यक्ष अक्षय काशीद, मनसे खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब, खारघर सचिव संतोष पंडित, मनसे व्यापारी सेलचे सचिव विनय कदम, मनसे शाखा ४ चे अध्यक्ष आदर्श कांबळे, विभाग अध्यक्ष सागर सुर्वे, शैलेश शिंदे उपाध्यक्ष अरुण पळसकर, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रणिता परब, खारघर महिला सेना अध्यक्षा चंचला बनकर, उपाध्यक्षा नम्रता सुर्वे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
खारघर शहरात प्रभाग क्रमांक ४, ५ व ६ मध्ये मनसेच्या शाखा आहेत. खारघरमधील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. कोणत्याही नागरिकाला काही अडचण असेल, त्यांनी मनसे कार्यालयाशी संपर्क साधावा, आमचा मदतीचा हात सदैव पुढे असेल, अशी प्रतिक्रिया मनसे खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब यांनी यावेळी व्यक्त केली.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »