Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादीची रणरागिणी : सुमित्राताई पवार !

कोकण दर्पण ! कोकण लाईव्ह ! संजना महाडिक

एक गृहिणी, मात्र अवकाशाला गवसणी घालण्याची अविरत धडपड. नेरुळ, नवी मुंबईमध्ये सामाजिक कार्य व सार्वजनिक उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची रणरागिणी अर्थात सुमित्रा भगवान पवार होय. उच्चशिक्षित असलेल्या सुमित्रा पवार सामान्य गृहिणीला आपल्या पायावर स्वाभिमानाने उभे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.

सुमित्रा पवार या राष्ट्रवादीच्या नेरुळ पूर्वेकडील सक्रिय पदाधिकारी आहेत, नेरुळ पूर्व विभागाच्या तालुका अध्यक्षपदाची त्यांच्यावर जबाबदारी आहे. एक महिला असून त्यांच्यातील खंबीर नेतृत्वामुळे त्यांनी नेरुळ पूर्व विभागात राष्ट्रवादीची चांगली मोट बांधली आहे. नेरुळ पूर्वेकडील विविध नागरी प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठविला आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून आज सुमित्रा पवार घरोघरी पोहचल्या आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक १०० मध्ये सुमित्रा पवार यांचे जोरदार काम आहे. येथे महिलांचे मोठे संघटन त्यांनी उभे केले आहे. सुमारे २५० महिलांना सोबत घेऊन सखी उध्योगिनीची स्थापना करून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा त्यांचा निर्धार आहे. मागील पाच वर्षांपासून सखी महोत्सवाच्या माध्यमातून महिलांसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. नेरुळ प्रभाग क्रमांक १०० मधील विविध नागरी समस्यांविरोधात सुमित्रा पवार यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. रस्ते , गटारे , दिवाबत्ती, शौचालये आदी कामे मार्गी लावली. विभागातील पोलीस चौकी सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. विभगातील फेरीवाला प्रश्नावर पालिका प्रशासनाचा पाठपुरावा सुरु आहे. कोरोना काळात सुमित्रा पवार यांनी मोठे काम केले. आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा केली. मानव धर्म जोपासला. सुमित्राताईंच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्ताने पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विशेष सन्मान केला. सुमित्रा पवार या नेरुळ प्रभाग १०० मधील महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. माझ्या प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आहे, अशी प्रतिक्रिया सुमित्रा पवार यांनी व्यक्त केली.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »