पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : इंधन दरवाढीविरोधात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी रस्त्यावर उतरले. पेट्रोल , डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले आहेत. भाजप प्रणित केंद्र सरकार इंधन दरवाढ रोखण्यात अपयशी ठरल्याने केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून मित्र पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस व शिवसेनेच्या सयुंक्त विध्यमाने इंडिअन दरवाढीविरोधात खारघर येथे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढी तसेच गॅस सिलेंडर दरवाढीचा विरोध निषेध व्यक्त करण्यासाठी खारघर सेक्टर १२ नवरंग चौक या ठिकाणी सर्व खारघर मधील सर्व पदाधिकारी , युवक,महिला सेल,ओबीसी सेल युवती सेल*यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन केले. यावेळी महिलांनी चूल पेटवून स्वयंपाक केला . इंधन दरवाढ कमी करू असे सांगू भाजप सत्तेत आले आणि सत्ता मिळाल्यानंतर आहे त्या भावामध्ये आणखी मोठी दरवाढ करून जनतेची फसवणूक केल्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांनी यावेळी लगावला. तर भाजप सरकार जनतेला आणखी किती दिवस लुटणार आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस खारघर महिला अध्यक्षा राजश्री कदम यांनी आपलं महानरशी बोलताना केला.
यावेळी राष्ट्रवादीचे पनवेल शहरजिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य बी ए पाटील, सरचिटणीस रामदास नारकर , राष्ट्रवादी पनवेल युवक अध्यक्ष प्रमोद बागल, शिवसेना खारघर शहर प्रमुख शंकर ठाकूर, राष्ट्रवादी खारघर अध्यक्ष बळीराम नेटके, काँग्रेसचे नेते विश्वनाथ चौधरी, शिवसेनेचे नंदू वारुंगसे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे पनवेल अध्यक्ष विजय मयेकर, काँग्रेसचे खारघर अध्यक्ष कमांडर कलावत तसेच कार्यकर्ते, रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकण दर्पण





