Press "Enter" to skip to content

छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य गेलं कुठे ? विषयावर खारघरमध्ये व्याख्यान !


मराठा समाज खारघर संस्थेच्या वतीने आयोजन !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : मराठा समाज खारघर संस्थेच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी खारघर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे आयोज करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य गेलं कुठे ? विषयावर शिवव्याख्याते चंद्रकांत पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने खारघर सेक्टर १२ येथील उत्कर्षा हॉलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सव्वा दहा वाजता शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. दुपारी महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम होणार आहे. दुपारी साडेचार वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य गेलं कुठे ? विषयावर शिवव्याख्याते चंद्रकांत पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी सहा वाजता महिलांचे लेझीम प्रात्यक्षिक व महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. खारघरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा समाज खारघर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बी ए पाटील यांनी केले आहे.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »