संजना महाडिक :
पनवेल,कोकण दर्पण वृत्तसेवा : शेकडो महिलांच्या सहभागाने राष्ट्रवादी महिला काँग्रेस व डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर येथे आयोजित केला “वाण आरोग्याचं”हा कार्यक्रम चांगलाच रंगला. राष्ट्रवादी महिला खारघर शहर अध्यक्षा राजश्री कदम यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस व डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने “वाण आरोग्याचं”हा कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. खारघर राष्ट्रवादी महिला काॅग्रेसच्या वतीने खारघर येथे गुरुवारी सदर कार्यक्रम संपन्न झाला. वाण आरोग्याचे या सर्व कार्यक्रमांतर्गत महिलांचे फ्री मेडिकल चेकअप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी पनवेल जिल्हाउपाध्यक्षप प्रा बी ए पाटील, सरचिटणीस रामदास नारकर, विजय मयेकर ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्ष बळीराम नेटके, राष्ट्रवादीचे नेते सुरेश रांजवन, उद्योजक संतोष शेट्टी, खारघर शहर उपाध्यक्ष योगेश निपाणे, नरेश पाटील, संभाजी मोहीते , खारघर गुरुद्वारा कमिटीचे अध्यक्ष जसबिंदर सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. डाॅक्टर सेलचे डाॅ पंकज पाटील, डाॅ अचुत हडोले, डाॅ विरसिंह कदम, डाॅ सचिन व त्यांच्या टीमने आरोग्य शिबीर यशस्वी केले.
या कार्यक्रमात महिला पोलीस सुजाता गायकवाड व त्यांच्या सहकार्याची विशेष उपस्थिती लाभली. सुनंदा कुंभार ,संगीता पवार ,रेखा भागवत,संगीता सुर्वे ,सुनिता डेरे,नेहा पाटील,विजया मोहीते,विद्या सकटे ,चेतना तोटकेकर, छाया वैराग्य,माधवी ओंबळे,हेमा घाडगे,सोनाली पालव,स्नेहल शेवाळे, युवती अध्यक्ष प्रज्ञा चव्हान, बिना टंपी अशा अनेक महिलांनी सहभाग घेतला. यावेळी विधवा महिला ,जेष्ट नागरीक महीला सफाई कामगार महिला पोलीस महिला यांना सन्मानित करण्यात आले. महिलांचे विविध कार्यक्रम संपन्न झाले. उपस्थित महिलांचे राजश्री कदम यांनी अभिनंदन केले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे महिला धोरण केंद्रबिंदू मानून सदर कार्यक्रम राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर व पनवेल निरिक्षक भावनाताई घानेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर येथे पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी महिला आघाडीला विशेष सहकार्य करुन हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला, अशी माहिती आयोजक तथा खारघर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा राजश्री कदम यांनी दिली.
कोकण दर्पण.





