नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : विभागातील गुन्हेगारीवर नियंत्रण राखून जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने नेरुळ पश्चिम विभागातील सारसोळे प्रभाग सहा मधील प्रमुख चौकात सीसी टीव्ही कॅमेरा लावण्यात आले.
माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्या पुढाकाराने विभागात सीसी टीव्ही कॅमेरा लावण्यात आले.
कुकशेत गाव परीसरात, तसेच सेक्टर ६ येथील सागरदीप सोसायटी , हीमालय सोसायटी , साईविहार सोसायटी, वरुणा सोसायटी आदी ठिकाणी नगरसेवक सुरज पाटील यांच्या पुढाकाराने सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. नेरुळ पोलिसांना या सी सी टी व्ही यंत्रणेच्या सहकार्याने काही गुन्हेगार सुद्धा पकडण्यास मदत झालेली आहे. सोसायटी परीसरानंतर मुख्य चौक सुद्धा सी सी टीव्ही यंत्रणा बसवुन सुरक्षीत करण्याच्या उद्देशाने नागरीकांच्या शुभहस्ते ज्योतिर्लिंग सोसायटी परीसर व सेक्टर ६ नेरुळ येथील सातत्याने नागरीकांची वर्दळ असलेला मुख्य चौक, कंत दर्शन दरबार चौक येथे बसविण्यात आलेल्या सी सी टी व्ही यंत्रनेचे नागरिकांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
कोकण दर्पण.





