Press "Enter" to skip to content

रामदास नारकर यांची राष्ट्रवादी पनवेल शहरजिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर शहरातील सामाजिक कार्यकर्ते रामदास महादेव नारकर यांची पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या “सरचिटणीस” पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी सतीश पाटील अध्यक्ष, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, डॉ. शिवदास कांबळे कार्याध्यक्ष, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, प्राचार्य बी. ए. पाटील उपाध्यक्ष, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, अजिनाथ सावंत उपाध्यक्ष, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, बळीराम नेटके अध्यक्ष, खारघर शहर राष्ट्रवादी काँग्रेस, योगेश निपाने उपाध्यक्ष, खारघर शहर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह जसविंदर सैनी, संभाजी मोहिते व
मनिष कुळे आदी उपस्थित होते. रामदास नारकर हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. पनवेल शहरात आणि विशेषतः खारघर शहरात राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया रामदास नारकर यांनी यावेळी व्यक्त केली.
कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »