पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी महिला काँग्रेस व डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने “वाण आरोग्याचं”हा कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येत असून खारघर राष्ट्रवादी महिला काॅग्रेसच्या वतीने खारघर येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
खारघर येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेस जनसंपर्क कार्यलय से १२ येथे १० फेब्रु्रवारी रोजी दुपारी 3 वाजता सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
वाण आरोग्याचे या सर्व कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी फ्री मेडिकल चेकअप होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी पनवेल जिल्हाध्यक्ष
सतीश पाटील, जिल्हाउपाध्यक्षप प्रा बी ए पाटील,विजय मयेकर ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला खारघर शहर अध्यक्षा राजश्री कदम यांनी पत्रकारांना दिली.
कार्यक्रमाचे उदघाटन महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. शरद पवार यांचे महिला धोरण
विधवा महिला ,जेष्ट नागरीक महीला
सफाई कामगार महिला
पोलीस महिला ,यांना सन्मानित करण्यात येणार आहे. महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले असून महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजश्री कदम यांनी केले आहे.
कोकण दर्पण.





