पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तळोजा फेस २ येथे सामाजिक कार्यकर्ते ईकबाल नावडेकर यांच्या पुढाकाराने अल्पसंख्यांक समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऑल इंडिया मायनॉरिटी सेक्रेटरी मौलाना यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी आमदार विवेक पाटील , महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक सचिव संदीप म्हात्रे, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सचिव प्रसाद पाटील, पनवेल राष्ट्रवादी विधानसभा युवक अध्यक्ष सुनील ढेंबरे आदी उपस्थित होते. यावेळी अल्पसंख्यांक समाजाचे विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
कोकण दर्पण.





