नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम यांच्या वाहन चालकांसाठी हिनो मोटर्स यांच्या वतीने सलग सात दिवस रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यशाळा कार्यक्रम “वाहनांचा दहशतवाद ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेचा आरंभ झाला असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे जॉन कोषी सेल्स मॅनेजर हिनो मोटर्स,श्री यादव व नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे विविध अधिकारी उपस्थित होते. व्यसनमुक्ती ,तणाव मुक्ती व त्याचबरोबर रस्ता सुरक्षा, आरोग्य विषयी विशेष घ्यायची काळजी या विविध गोष्टींचा अभ्यास वाहनचालकांना या कार्यशाळेमध्ये दिला जात आहे. साडे आठशे वाहनचालकांना या सात दिवसांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. रस्ता सुरक्षा जनजागृती विषयावर कार्यशाळा कार्यक्रम ” वाहनांचा दहशतवाद ” विनय मोरे यांनी यांनी सादर केला. वाहनचालकांची निर्णयक्षमता तपासणीकरिता ओम विनय मोरे यांनी एक प्रयोग सादरीकरण केला.
कोकण दर्पण.





