सेवा हाच खरा धर्म : युवानेते रणजित नाईक !
नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : मनुष्याच्या आयुष्यात दृष्टी अत्यंत महत्वाची आहे. दृष्टी नसेल आयुष्य अंधकारमय होऊन जाते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या नेत्रांची अर्थात आपल्या डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे. सेवा याच खरा मानवधर्म या सामाजिक उद्देशानेच दारावे- सिवुड्स विभागातील नागरिकांसाठी दोन दिवशीय मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले, अशी प्रतिक्रिया युवानेते रणजित नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
दारावे- सिवुड्स प्रभाग क्रमांक ९२ व ९९ मधील सर्व नागरिकांसाठीनवी मुंबई भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस रणजित नाईक व समाजसेविका प्रणिता नाईक यांच्या पुढाकाराने दोन दिवशीय मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. ६ व ७ फेब्रुवारी रोजी सिविड्स -दारावे येथे संपन्न झालेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिर व आरोग्य शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. कृष्णा ऑप्टिकल आणि तेरणा हॉस्पिटलच्या विशेष सहकार्याने सदर उपक्रम
यशस्वीपणे पार पाडण्यात आला.
सिवुड्स – दारावे विभागातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन विभागात मागील अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. मागील पाच वर्षांपासून सातत्याने आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले जात असल्याचे समाजसेविका प्रणिता नाईक यांनी सांगितले.
कोकण दर्पण.





