Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सिवूडस-दारावे येथे विविध कार्यक्रम !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सिवूडस-दारावे महिला मंडळाच्या वतीने सिवूडस दारावे येथे रविवारी ७ फेब्रुवारी रोजी येथील आश्रय हॉल मध्ये सायंकाळी ६ वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून सदर कार्यक्रमासाठी महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
माजी नगरसेवक संदीप सुतार आणि माजी नगरसेविका सलूजा सुतार यांच्या पुढाकाराने सिवूडस दारावे प्रभाग क्रमांक ९२ व ९९ मधील महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचे हळदीकुंकू, महिलांसाठी पाककला स्पर्धा, जेष्ठ नागिकांसाठी वक्तृत्व स्पर्धा, कोव्हीड योध्याचा सन्मान व महिलांसाठी सलाड डेकोरेशन प्रशिक्षणक आयोजित केले आहे.
यानिमित्ताने प्रभागातील सेक्टर २५ मधील जॉगिंग पार्क, ओपन जिम व गार्डन ,उद्यानात संगीतमय लाईट्स लावणे, रस्त्यांचे डांबरीकरण आदी नागरी कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सिंधुताई सपकाळ, आमदार शशिकांत शिंदे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, माजी खासदार आनंद परांजपे, निरीक्षक प्रशांत पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकनकर, जिल्हाध्यक्ष अशोक गावडे,नगरसेविका सपना गावडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, कांग्रेस नेते संतोष शेट्टी आदी उपस्थित राहणार आहेत.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »