Press "Enter" to skip to content

खारघरमध्ये पंतप्रधान श्रमयोगी योजना ऑनलाईन नोंदणी शिबिर !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महानगर पालिकेच्या नगरसेविका संजना कदम आणि भाजप युवानेते समीर कदम यांच्या पुढाकारातून बुधवारी खारघर सेक्टर ८, प्रभाग ६ येथे पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना ऑनलाईन नोंदणी शिबिर संपन्न झाले.

या योजनेसाठी नोंदणी करणाऱ्यां व्यक्तींना स्मार्ट कार्ड दिली जाणार आहेत. संजना कदम आणि समीर कदम यांच्या पुढाकारतून नुकतेच पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान नोंदणी शिबिर राबविण्यात आले. यामध्ये नावे नोंदलेल्या व्यक्तींना १० दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहे. नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहेत, अशी माहिती आयोजक समीर कदम यांनी दिली.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »