नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत तब्ब्ल चार सुवर्ण पदके पटकावून देशात सर्वप्रथम आलेल्या बबन झोरे नामक बॉडीबिल्डर खेळाडूला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी यांनी आंतराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
नुकत्याच नवी दिल्ली येथे पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत खालापूर तालुक्यातील बबन झोरे सहभागी झाला होता. या स्पर्धेत बबनने चार सुवर्ण पदके मिळविली आहेत. वेट लिफ्ट, बेंच प्रेस स्पर्धेत ५९ वजनी गटात देशात पहिला आला आहे. महाराष्ट्राचा स्ट्रॉंग मॅन ‘किताब देखील बबनने पटकावला आहे. बबनच्या पॉवर लिफ्टिंग कौशल्याने त्याने देशाचे आणू महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे.सध्या बबन आंतराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंगची तयारी करीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी यांनी बबनची भेट घेऊन त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रसिध्द ज्योतिष तज्ञ संतोष लवटे महाराज ,डॉ.गणेश झोरे ,जितेन्द्र अलदर,रोहित नारवानी आदी उपस्थित होते.
कोकण दर्पण.





