नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : मनुष्याच्या आयुष्यात दृष्टी अत्यंत महत्वाची आहे. दृष्टी नसेल आयुष्य अंधकारमय होऊन जाते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या नेत्रांची अर्थात आपल्या डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे. मात्र, भाजपचे युवानेते रणजित नाईक यांनी आपल्या विभागातील नागरिकांच्या डोळ्यांची काळजी घेत दारावे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.सिवुड्स -दारावे प्रभाग क्रमांक ९२ व ९९ मधील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रणजित नाईक यांनी केले आहे.
नवी मुंबई भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस रणजित नाईक यांच्या पुढाकाराने ६ व ७ फेब्रुवारी रोजी सिविड्स -दारावे येथे मोफत नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कृष्णा ऑप्टिकल यांच्या सौजन्याने शिवम क्लासिक सोसायटी, शॉप क्रमांक ७, सेक्टर २३, दारावे येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सदर शिबीर सर्वांसाठी खुले राहणार आहे. सदर शिबिराचा लाभ विभागातील नागरिकांनी घ्यावा आणि विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने सदर शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन समाजसेविका प्रणिता नाईक यांनी केले आहे.
कोकण दर्पण.





