नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : छावा प्रतिष्ठाण प्रणित छावा शिवकालीन बहुउद्देशीय कलामंचच्या वतीने नवी मुंबईत आयोजित केलेल्या भव्य अशा राज्यस्तरीय पुरस्कार २०२१ सोहळ्यात अनेक कर्तुत्ववान व्यक्तींचा सन्मान सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. छावा प्रतिष्ठाणचे संस्थापक – अध्यक्ष तथा वस्ताद अमितदादा गडांकुश यांच्या संकल्पनेतून सदर गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कोपरखैरणे, नवी मुंबई येथील लोहाना भवन हॉल, सेक्टर १०, महानगर पालिका शाळेसमोर, डी मार्ट जवळ रविवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सायंकाळी सदर राज्यस्तरीय पुरस्कार २०२१ संपन्न झाला. शिवकालीन शस्त्रकला, क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध व्यक्तिमत्वाचा यानिमित्ताने गौरव करण्यात आला.
सहाय्यक पोलीस आयुक्त डाॅ. राज खतीब, उप वरिष्ट पोलीस निरीक्षक विजयकुमार भोगळे, सिनेकलाकार संभाजी माने, अरूण पिसाळ, सिहान अतुल बोरा, शस्त्रास्त्र पारंगत गिरीश जाधव, नगरसेवक रामदास पवळे, डी. व्ही. एस इंग्लिश स्कुल प्रिंसीपल अपर्णा पाटील, युवा नेते सौरभ ऋषिकांत शिंदे आदींना यावेळी राज्यस्तरीय पुरस्कार २०२१ सन्मानाने गौरविण्यात आले, अशी माहिती आयोजक तथा वस्ताद अमित दादा गडांकुश यांनी दिली.
कोकण दर्पण.





