Press "Enter" to skip to content

पनवेल मनपाच्या वतीने पल्स पोलिओ मोहीम !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी असा संकल्प करून भारतात पोलिओ मोहीम राबविण्यात येते. आपला भारत देश पोलिओ मुक्त आहे. परंतु काही देशांमध्ये पोलिओ अध्यापि असल्याने तो पुन्हा परत येऊ शकतो. म्हणून याबाबत सतर्कता बाळगून देशात पल्स पोलिओ मोहीम राबविले जाते. पनवेल महानपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण पनवेल महापालिका क्षेत्रात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. पनवेल मनपाच्या वैधकीय विभागाने विशेष मेहनत घेतली.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »