Press "Enter" to skip to content

तळोजा येथे लवकरच नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर ! पालकमंत्र्यांच्या दालनात बैठक संपन्न ! शहाबाज पटेल यांचा पाठपुरावा !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महापालिका क्षेत्रातील तळोजा येथे नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर उभारणेबाबतच्या कामाची लवकरच पूर्तता व्हावी यासाठी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या मंत्रालयातील दालनात आज विशेष बैठक झाली.

तळोजा गावातील विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी तळोजा येथे स्वतंत्र वीज ट्रान्सफॉर्मर उभारण्यात यावे जेणेकरून पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होऊ शकेल यासंदर्भात सखोल व सकारात्मक चर्चा झाली. दरम्यान तळोजा येथे सुसज्ज वीज ट्रान्सफॉर्मर उभारण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून कालबद्ध वेळेत काम पूर्ण करण्यासाठी अदिती तटकरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले.

यावेळी अजिनाथ महादेव सावंत उपाध्यक्ष, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, प्रमोद बागल अध्यक्ष, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शहबाज पटेल कार्याध्यक्ष, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस, बळीराम नेटके अध्यक्ष, खारघर शहर राष्ट्रवादी काँग्रेस, रणजित नरुटे सरचिटणीस, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस व महावितरणचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »