नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करणार, असा निर्धार आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नवी मुंबईत केला. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मनोविकास आघाडीने आज शक्ती प्रदर्शन केले.
शिवसेनेचे नेते विजय नाहटा यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने वाशी येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार शशिकांत शिंदे, शिवसेनेचे नेते नेते विजय चौगले, राष्ट्रवादी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, राष्ट्रवादीचे निरीक्षक प्रशांत पाटील,काँग्रेसचे नेते संतोष शेट्टी, काँग्रेसचे नेते रवींद्र सावंत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रोहिदास पाटील, शहर प्रमुख विजय माने , नगरसेविका सुरेख अशोक नरबागे तसेच महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते.
कोकण दर्पण.





