Press "Enter" to skip to content

शिवशरण पुजारी यांची माथाडी कामगार संघटनेच्या महाराष्ट्र सचिवपदी निवड !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबईतील धडाडीचे युवा नेता शिवशरण पुजारी यांची महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष विपुल काळे यांनी नुकतीच शिवशरण पुजारी यांच्यावर सदर जबाबदारी दिली आहे.

शिवशरण पुजारी हे मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबईतील समाजकारणात कार्यरत आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तुर्भे विभागात त्यांचे मोठे समाजकार्य चालते. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ते खंदे समर्थक असून राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मल्लिकार्जुन पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीची वाटचाल सुरु आहे. कामगारांच्याप्रति शिवशरण यांना नितांत आस्था असून कामगारांच्या न्याय हक्कासाठी आपण प्रामाणिक काम करणार असल्याची प्रतिक्रिया शिवशरण पुजारी यांनी यावेळी व्यक्त केली.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »