पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेना खारघर शहर आणि संत सावतामाळी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने खारघर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेचे खारघर शहर उपाध्यक्ष गणेश बनकर यांच्या पुढाकाराने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
खारघर सेक्टर १५ येथील मनसे मध्यवर्ती कार्यालया जवळ रविवारी ३१ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे.
कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रक्तदान करणे, ही सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे. या जाणिवेतून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. खारघर मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन आयोजक गणेश बनकर यांनी केले आहे.
कोकण दर्पण.





