नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : छावा प्रतिष्ठाण प्रणित छावा शिवकालीन बहुउद्देशीय कलामंचच्या वतीने नवी मुंबई येथे भव्य अशा राज्यस्तरीय पुरस्कार २०२१ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. छावा प्रतिष्ठाणचे संस्थापक – अध्यक्ष तथा वस्ताद अमितदादा गडांकुश यांच्या संकल्पनेतून हा गौरव सोहळा संपन्न होत आहे.
कोपरखैरणे, नवी मुंबई येथील लोहाना भवन हॉल, सेक्टर १०, महानगर पालिका शाळेसमोर, डी मार्ट जवळ रविवार दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ४.३० वाजता सदर राज्यस्तरीय पुरस्कार २०२१ संपन्न होत आहे. शिवकालीन शस्त्रकला, क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध व्यक्तिमत्वाचा यानिमित्ताने गौरव केला जाणार आहे. या गौरव सोहळ्याला उपस्थित राहून कर्तृत्ववान व्यक्तित्वाचा सन्मान वाढवावा, असे आवाहन आयोजक तथा वस्ताद अमित दादा गडांकुश यांनी केले आहे. अधिक महैतीसाठी ९८१९२८९५७९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण दर्पण.





