नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : सीबीडी -बेलापूर प्रभाग क्रमांक १०३ मधील नगरसेविका सुरेखा अशोक नरबागे यांनी आपल्या प्रभागात नवीन मतदार नाव नोंदणी शिबिराचे आयोजन केले आहे. २८ ते ३० जानेवारी दरम्यान सदर शिबीराचे आयोजन सेक्टर ८ मधील संभाजीनगर येथे सुरू झाले आहे.
आपल्या प्रभागातील कोणत्याही नागरीकाचा मतदानाचा हक्क वाया जाऊ नये, तरुण- तरुणी यांना आपल्या नावाची नोंदणी करून मतदानाचा मुलभूत हक्क प्राप्त करावा, या उद्देशाने तीन दिवशीय ऑनलाईन मतदार नाव नोंदणी शिबिराचे आयोजन केल्याची माहिती नगरसेविका सुरेखा अशोक नरबागे यांनी दिली. दरम्यान, सदर शिबिराचा लाभ घेऊन मतदानाचे आपले राष्ट्रीय कर्तव्य निभवावे, असे आवाहन समाजसेवक अशोक नरबागे यांनी केले आहे.
कोकण दर्पण





