Press "Enter" to skip to content

अशोक मोटे यांची भाजपा उत्तर रायगड जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कळंबोली मधील रामशेठ ठाकूर यांचे अत्यंत विश्वासू पदाधिकारी अशोक मोटे यांची उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी नुकतीच जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती केली आहे. अशोक मोटे माझ्या सारख्या सक्रिय कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहून प्रशांत ठाकूर यांनी न्याय दिला आहे,अशी भावना अशोक मोटे यांनी व्यक्त केली.
अशोक मोटे यांनी पक्षाची याअगोदर अनेक पदे भूषविली आहेत. आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. धनगर समाज आरक्षण कृती समितीवरही त्यांनी काम केलेले आहे . धनगर समाजाच्या अनेक आंदोलनामध्ये त्यांचे योगदान आहे . सध्या यशवंत राजे अर्बन मल्टिपल निधी या संस्थेचे चेअरमन आहेत . अनेक सामाजिक सेवा संस्थांशी त्यांचा संबंध आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीमुळे अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत . भटके-विमुक्त समाजासाठी ही त्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी आनंद व्यक्त केला आहे. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. कळंबोलीचे शहराध्यक्ष रविनाथ पाटील, नगरसेवक श्री अमर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती मोनिका ताई महानवर यांनी अशोक मोटे यांचे अभिनंदन केले.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »