डाँ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचा उपक्रम !
नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : डाँ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने समाजरत्न पुरस्कार व जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ३० जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता खारघर सेक्टर १२ शिल्पचौक येथील एम.टी.डी.शी.रेसिडंसी येथे सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
डाँ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने प्रवीण मोरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम होणार आहे. समितीचे संस्थापक- अध्यक्ष चंद्रकांत जगताप यांच्या माध्यमातुन गेल्या आठ वर्षापासुन समाजरत्न पुरस्कार व जीवनगौरव पुरस्कार सोहळा पार पडत आहे. या ही वर्षी हा पुरस्कार सोहळा कोविड-१९ च्या महामारीमुळे शासनाने घालुन दिलेल्या निर्बधानुसार मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा पार पडत असुन सदर सोहळ्यात समाजरत्न , जीवन गौरव पुरस्काराने तर काहीना सन्मानपत्र देवुन सन्मानीत करण्यात येणार आहे.
कोकण दर्पण.





