Press "Enter" to skip to content

वाचन संस्कृती वाढविण्यासाठी मनसे देणार रक्तदात्यांना पुस्तक भेट -ऍड. अक्षय काशीद !

वाचन संस्कृती वाढविण्यासाठी मनसे देणार रक्तदात्यांना पुस्तक भेट – मनविसे जिल्हाध्यक्ष ऍड अक्षय काशीद यांची माहिती !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : रक्त दान, श्रेष्ठ दान हे ब्रीदवाक्य घेऊन मनसेचे पनवेल शहराध्यक्ष कै.शीतलदादा सीलकर यांच्या स्मरणार्थ पनवेलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शितलदादा सीलकर यांच्या स्मृतीस कृतीशील श्रद्धांजली म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल शहर रायगड जिल्ह्याच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. २६ जानेवारी रोजी तथास्तु हॉल, धुतपापेश्वर जवळ, पनवेल येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ दरम्यान सदर शिबिर संपन्न होणार आहे. सध्याचा कोरोनाचा काळ सुरू आहे. रुग्णालयांमध्ये होणारा रक्ताचा तुटवडा ही अत्यंत गंभीर बाब आहे, त्यामुळे समाजातून रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व निभावणे आत्यावश्यक आहे. त्या जाणिवेतून रक्तदान शिबिर घेण्यात आले आहे.
वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांच्या वतीने पुस्तक भेट देण्यात येणार आहे,अशी माहिती मनविसेचे रायगड जिल्हाध्यक्ष ऍड अक्षय काशीद यांनी कोकण दर्पणशी बोलताना दिली. रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन मनविसेच्या वतीने करण्यात आले आहे.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »