Press "Enter" to skip to content

प्रजासत्ताकनिधी रक्तदान शिबिराचे आयोजन ! नगरसेवक निलेश बाविस्कर यांचा पुढाकार !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून खारघर येथे आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. २६ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सदर शिबीर होणार आहे. गुडवेल कॉम्प्लेक्स, शॉप क्रमांक १३ व १४, सेक्टर १५ , खारघर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. खारघर प्रभाग सहाचे नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या पुढाकाराने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अद्यापि कोरोनाची परिस्थिती आहे. देशात आणि राज्यात लसीकरणाला सुरुवात जरी झाली असली तरी कोरोनाचा प्रभाव आणि त्याचे सावट कायम आहे. त्यामुळे आपण काळजी घेणे गरजेचे आहे. या काळात रक्तपुरवठा मोठ्या प्रमाणात करावा लागल्याने रक्ताचा तुटवडा भासू लागला. त्यामुळे आपली नैतिक जबाबदारी म्हणून प्रजासत्ताक दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचे नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी सांगितले. यानिमित्ताने रहिवाशांसाठी आरोग्य शिबिराचे देखील आयोजन केले आहे. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक ६ खारघर मधील सर्व रहिवाशानी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, मोठ्या संख्येने रक्तदान शिबीर करावे, असे आवाहन निलेश बाविस्कर यांनी केले आहे.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »