पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या विविध योजना आपल्या प्रभागात प्रखरपणे राबविण्याच्या अनुषंगाने खारघर येथील नगरसेविका संजना समीर कदम यांनी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे.
खारघर प्रभाग ६ मधील सेक्टर १८ येथे तीन दिवशीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २२ जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान हे शिबिर खारघर सेक्टर १८, सुप्रीम टॉवर शॉप क्रमांक ४ मध्ये या शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना, पंतप्रधान जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना, प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान, डिजिटल लिटरसी आदी योजनांची माहिती देऊन त्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासायही या शिबिराचे आयोजन केल्याची माहिती नगरसेविका संजना कदम यांनी दिली. खारघर प्रभाग ६ मधील नागरिकांनी तसेच खारघरवासीयांनीया योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे नेते समीर कदम यांनी केले आहे.
कोकण दर्पण.





