Press "Enter" to skip to content

स्पिड ब्रेकरला सफेद पट्ट्या ! सिड्स फाऊंडेशनचा उपक्रम !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर विभागात होणारे अपघात टाळण्यासाठी सिड्स फाऊंडेशनने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. विभाताची ज्या स्पीड ब्रेकर्सना पांढऱ्या पट्ट्या मारलेल्या नाहीत, तिथे पांढऱ्या पट्ट्या मारण्याचे काम सदर संस्था करीत आहे.
सिड्स फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून सेक्टर १६ खारघर येथे रस्त्यावरिल न दिसणा-या स्पिड ब्रेकरला सफेद कलरच्या पट्या काढण्यात आल्या. अनेक दिवसांपासून सिडकोच्या माध्यमातून अनेक सेक्टर मध्ये विविध रस्त्यांवर स्पिड ब्रेकर बसवण्यात आले आहेत.परंतु हे स्पिड ब्रेकर बसविल्यानंतर ते दिसण्यासाठी व्हाईट कलरच्या पट्टया स्पिड ब्रेकर वर मारावा लागतात. अशा पटया कोणत्या ही स्पिड ब्रेकर वर मारलेल्या दिसत नाही.अनेक वाहनं या रस्त्यावरुन जातांना व येताना सिड्स फाऊंडेशन या संस्थेच्या काही सदस्यांच्या असे लक्षात आले कि रस्त्यांवर गाडी चालवतांना स्पिड ब्रेकर च्या एकदम जवळ गेल्यानंतर तो स्पिड ब्रेकर दिसतो किंवा दिसत पण नाही.आणि स्पिड ब्रेकर दिसल्यावर अचानक ब्रेक लावला कि मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतो.असे अनेक किरकोळ अपघात या ठिकाणी झाले आहे.या वरती त्वरित कार्यवाही व्हावी. या संदर्भात सिड्स फाऊंडेशनच्या माध्यमातून मिटींग आयोजित केली.व सिड्स फाऊंडेशन च्या माध्यमातून त्वरित निर्णय घेऊन सदर स्पिड ब्रेकर वरती कलर पट्या काढण्यात आल्या. या वेळी सिड्स फाऊंडेशनचे नंदु वारुंगसे,कौशल शर्मा, जयसिंग माने, सचिन गोरे, बाळु गावडे, अप्पासाहेब वाळुंज, नवनाथ वाळके , जालिंदर चिकने, व अनेक सदस्य उपस्थित होते.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »