पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महानगर क्षेत्रात सध्याच्या स्थितीत वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सदर बाब येथील नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. या गंभीर समस्येची तीव्रता लक्षात घेता ‘वातावरण फाउंडेशन’ यांच्यातर्फे नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याकरीता खारघरमध्ये कृत्रिम फुप्फुस मंडळाची स्थापना करण्यात आली.
या जनजागृती अभियानामध्ये पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर, माजी सभापती तथा जेष्ठ नगरसेवक अभिमन्यू धर्मा पाटील, पनवेल महानगरपालिका नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेवक निलेश बाविस्कर व इतर अनेकांनी भेट दिली.
कोकण दर्पण.





