नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा प्रलंबित ठेवल्याने सदर प्रकरणात आता राजकारण शिरले आहे. विमानतळ नामांतराबाबत अनेक भूमिका पुढे येत असून सोमवारी एमआयएमने राज्याचे माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांच्या नावासाठी आग्रह धरत आंदोलन केले.
एमआयएम विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस शाहनवाज खान यांच्या नेतृत्वाखाली सिडको प्रशासनाची आज भेट घेण्यात आली. प्रकल्पग्रस्थांमार्फत दि बा पाटील यांच्या नावाची मागणी होतेय तर शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला पसंती देण्यात आलेय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला महाराजा यशवंतराव होळकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कांँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी यांनी केली आहे. आता एमआयएमने देखील विमानतळाला दिवंगत मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.
कोकण दर्पण.





