पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर वुमन्स सोशल असोसिएशन आणि नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय यांच्या संयुक्त विद्यमानाने खारघर येथे महिलांसाठी सोशल डिस्टंसिंग नियमाचे काटेकोरपणे पालन करून विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खारघर मधील शेकडो महिला उपस्थित होत्या.
पनवेल महानगरपालिका महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातून महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमाबाबत उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. शनिवार संपन्न झालेल्या शिबिरात महिला बचत गटांना मार्गदर्शन करण्यात आले. महिला व बालकल्याण योजने अंतर्गत महिलांना व मुलींना विविध व्यावसायिक प्रशिक्षण मार्गदर्शन, महिलांना स्वयंरोजगार, छोट्या व मोठ्या उद्योग करण्याची संधी आदी विषयांवर पनवेल महानगरपालिकाच्या अधिकारी मार्फत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पनवेल महापालिका सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, महापालिका महिला बालकल्याण अधिकारी विनया म्हात्रे, महिला बालकल्याण सभापती मोनिका महानवर, भाजपा रायगड जिल्हा चिटणीस गीता चौधरी आदी मान्यवर उपस्थित होत्या. खारघर मधील उपस्थित महिलांना नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी शुभेच्छा दिल्या.
कोकण दर्पण.





