Press "Enter" to skip to content

विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खारघर शहर महिला अध्यक्ष राजश्री कदम यांच्यावतीने आरोग्य शिबिर राबविण्यात आले.

  "माझा प्रभाग, परीसर निरोगी व्हावा, वृद्ध, लहान मुले, तरुण यांचे आरोग्य सुदृढ राहावे,  यासाठी  "प्रथमोपचार,  रक्तदाब, शुगर, ऑक्सिजन, टेम्परेचर सारख्या आजारांची मोफत तपासणी करुन तज्ज्ञांकडून मोफत सल्ला" देण्यात आला. या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून "विरोधी पक्षनेते प्रितम दादा जनार्दन म्हात्रे" उपस्थित होते. नगरसेवक गुरुनाथ गायकर, इश फाऊंडेशनच्या किर्ती ताई मेहरा, शेकाप युवानेते मंगेश अपराज, सुनील बुचडे उपस्थित होते. या शिबिराला निर्माण डायग्नोस्टिक सेंटर च्या नूतन तलाठी मॅडम आणि त्यांची टीम यांच्या वतीने आरोग्य सेवा देण्यात आली. सदर आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी युवानेते रोहन कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »